महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल प्रीप्रायमरी गटाची शैक्षणिक सहल संपन्न
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या प्री प्रायमरी गटाची शैक्षणिक सहल शनिवार दि.1/2/2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे व उपस्थित पालकांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले व ही सहल अकलूज दर्शनासाठी रवाना झाली.
सुरूवातीला ही सहल अकलूज येथील शिवपार्वती मंदिरामध्ये पोहचली या ठिकाणी शिवपार्वतीचे दर्शन घेतले या ठिकाणी विद्यार्थ्यांना नाष्टा देण्यात आला.तद्नंतर शिवसृष्टी येथे भेट देण्यात आली.या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा, छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम,शिव राज्य अभिषेक सोहळा इत्यादी प्रसंग चित्रशिल्पामध्ये साकारले आहेत.हे पाहिल्यानंतर गड अकालाई देवीचे दर्शन घेऊन आनंदी गणेशमंदिर येथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला व परतीच्या प्रवासात वेळापूर येथील पुरातन व पांडवकालीन मंदिरामध्ये अर्धनारीनटेश्वराचे दर्शन घेऊन ही सहल विद्यालयामध्ये सुखरूप परतली.
ही सहल यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. सुकेशनी नागटिळक,सहल विभाग प्रमुख लक्ष्मी स्वामी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.