महाराष्ट्र

सावे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.

सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 16 जून रोजी शैक्षणिक वर्ष 2025 – 26 या वर्षामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता आठवी, नववी व दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री शेळके सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री शिवाजी वाघमोडे ,सावेगावचे तंटामुक्त अध्यक्ष मा. श्री बाबासो बंडगर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मा. श्री म्हाळाप्पा गावडे उपस्थित होते.

सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे सावे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी वाघमोडे, तंटामुक्त अध्यक्ष बाबासो बंडगर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष म्हाळाप्पा गावडे यांचे स्वागत व सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

त्यानंतर इयत्ता आठवी, नववी व दहावी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब फुल, पाठ्यपुस्तक व जिलेबी देऊन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. जिद्द, चिकाटी व मेहनतीने यश मिळवा असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी व समस्त सावे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील सहशिक्षक श्री. गावडे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button