सांगोला येथे रविवारी शाश्वत डाळिंब मार्गदर्शनाचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील सांगोला-जत रोडवरील मुक्ताई रिसॉर्ट येथे रविवार दि.21 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता डाळिंबरत्न डॉ. बाबासाहेब गोरे सर यांचे मोफत डाळिंब मार्गदर्शन आयोजित केले आहे.

सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे डाळिंब पिकवणे आणि टिकवणे आव्हानात्मक झाले आहे. त्यातच डाळिंबास मर आणि तेल्या या प्रमुख समस्या भेडसावत आहेत. सदर कार्यक्रमात गोरे सर हे नविन डाळिंब लागवड, मृगबहार व्यवस्थापन, मृगबहाराचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, किड तसेच तण व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यशराज गांडूळ खत प्रकल्प वाटंबरेचे उद्योजक श्री.सुरेश पवार, प्रगतशिल डाळींब शेतकरी व डाळिंब मार्गदर्शक श्री.विजयसिंह वराडे आणि केजीएन डाळींब फार्म नाझराचे श्री.अशपाक काझी सर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री.सुरेश पवार (मो.82082 29040) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button