सांगोला तालुकाक्राईममहाराष्ट्र

गहाळ झालेले ०६ मोबाईल तक्रारदारास परत

 

सांगोला:- सांगोला पोलीस ठाणे हददीमध्ये दिनांक ०१/०१/२०२४ ते २८/०२/२०२४ रोजी पर्यंत सांगोला पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले एकुण ०६ मोबाईल एकुण अंदाजे किमंत ९६०००/- रू चा हे तांत्रीक विषलेश्नाद्वरे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत.

आशा प्रकारे आजपर्यंत दिनांक ०१/०१/२०२४ ते २८/०२/२०२४ सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकुण २२ मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकुण ०६ मोबाईल अंदाजे किमंत ९६०००/- रू यांचा शोध घेवुन ०६ तक्रारदारस परत केले आहे.

सदरची कार्यावाही ही मा. पोलीस आधीक्षक सो श्री शिरीष देशपांडे सो, मा. अपर पोलीस आधीक्षक श्री प्रितम यावलकर साो. मा. उपविभागीय पोलीस आधिकारी श्री विक्रम गायकवाड साो यांच्या मार्गदशना खाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्री विकास दिडुरे यांचे मार्गदशानाने पोकॉ/१३६८ सचिन राठोड (सायबर पोलीस ठाणे) सांगोला पोलीस ठाणेचे पोकॉ/६२० शहाजहान शेख यांनी केल आहे. व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या पुढे ज्या मोबाईल धरकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हदिदतील पोलीस ठाणे येथे मोबाईलचे सपुर्ण कागदपत्रसह रितसर तक्रार नोंदवावी असे आवाहन मार्गदशनाखाली सांगोला पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे साहेब यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!