महाराष्ट्र

नॅशनल स्टडी सेंटरच्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी )- नॅशनल स्टडी सेंटरच्या दोन विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

नॅशनल स्टडी सेंटर, सांगोला मधील विद्यार्थी श्री. सागर दत्तात्रय बनकर, सांगोला याची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला जिल्हा मुंबई येथे ITI इन्स्ट्रक्टर पदी, तसेच सचिन महादेव हाके, जवळा ता. सांगोला याची रायगड येथे डीसीसी बँक ज्युनियर क्लर्कपदी मध्ये निवड झाल्याबद्दल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोलाचे प्रभारी प्राचार्य जावेद शिखलगार, व डीसीसी बँक सांगोला चे मॅनेजर श्री.भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना प्राचार्य जावेद शिखलगार यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक जागा शासन भरणार  असून येत्या दोन वर्षांत विद्यार्थीनी सातत्यपूर्ण अभ्यास करुन  यश मिळवावे,तसेच प्रतिकूल परिस्थितीत ITI इन्स्ट्रक्टर पदी सागर बनकर  यांची निवड  झाल्याबद्दल कौतुक केले..यावेळी प्रमुख उपस्थिती स्टडी सेंटरचे संचालक रमेश फुले (सर) यांची होती

, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अच्युतराव  फुले  व आभार प्रदर्शन  प्रसाद  फुले सर यांनी केले.यांवेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa