जुनोनी परिसरात अब्जावधी रुपयांचा बेदाणा उद्योग मात्र शासनाचे दुर्लक्ष….

जानेवारी ते एप्रिल क्वचितच मेच्या मध्यांपर्यंत चालणाऱ्या सांगोला तालुक्यातील जुनोनी काळूबाळूवाडी हातीद तिप्पेहळी परिसरात बेदाणा निर्मिती व्यवसायामुळे चार महिन्यात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. या व्यवसायाच्या आवश्यक वस्तूंच्या खरेदी विक्री माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळतो. मात्र तरीही शासन या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा का देत नाही? हा प्रश्न आहे.
 सांगोला तालुक्यातील उष्ण व कोरडे हवा मान द्राक्षांपासून बेदाणा बनविण्यासाठी उपयुक्त असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती शेड आहेत. सधन भागातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी या परिसरात शेतकऱ्यां च्या नापीक जमिनी विकत किंवा भाडे तत्वावर घेऊन याठि काणी मोठ्याप्रमाणावर बेदाणा निर्मितीशेड उभारणी केली  विशेषतः कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील सांगोला तालुक्यातील जुनोनी, हातीद पर्यंतचा भाग सुमारे सात हजारांवर बेदाणा शेडनी व्यापलेला आहे. प्रतिवर्षी एका बेदाणाशेडमध्ये सरासरी २५ ते३० टन बेदा णा निर्मिती केली जाते.(किमान)अशाप्रकारे सात हजार शेड मधून सुमारे २० ते २५ हजार टन बेदाण्याचे चार महि न्यात उत्पादन होते. याशिवाय काही द्राक्षउत्पादक स्वतःचे शेड तयार करून त्यामध्ये बेदाणा उत्पादन घेतात ते वेगळे.
  गेल्या काही वर्षांपासून कोरोना, कमी मार्केटिंग,अवकाळी पाऊस आणि द्राक्षांना दर कमी असल्याने मोठ्या प्रमाणा वर बेदाणा निर्मिती होत आहे. भारतीय ग्राहकांना वर्षभर पुरवठा करत या बेदाण्याची निर्यातही होते आहे.
 बेदाणा व्यवसायामध्ये चार किलो चांगल्या द्राक्षांपासून सरासरी एक किलो बेदाणा निर्माण होतो. मात्र हा बेदाणा तयार करण्यासाठी ज्या प्रक्रिया होतात. त्यासाठी बऱ्याच पूरक गोष्टींची गरज असते.
  यामध्ये वेगवेगळ्या केमिकल,, द्राक्षे शेडमध्ये सुकविण्या साठी शेडनेट, झाडणी साठी काठ्या, पाणी, मळणी साठी ऑईल, प्लॅस्टिक पिशवी,बॉक्स,,द्राक्षे व तयार बेदाणा वाह तुकीसाठी वाहने त्यांना लागणारे इंधन, मनुष्यबळ,आदी साठी होणारी उलाढाल ही कोट्यावधी मध्ये आहे. तर तयार बेदाण्याच्या विक्रीतून होणारी उलाढाल अब्जावधी मध्ये आहे.
  एका शेडवर किमान पन्नास स्त्री पुरुष कामगारांची आव श्यकता असते.(सध्या मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्या ने बेदाणा निटींग करून त्याची प्रतवारी केली जाते. यापूर्वी हजारो महिला कामगारांना बेदाणा स्वच्छ करण्याच्या का मातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होता.)या परिस रात असणाऱ्या सात हजारांवर बेदाणा शेडमधून सुमारे ३५ हजारांवर अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळत आहे.यात आपल्या राज्यासह मध्यप्रदेश, बिहार येथील कामगार बेदा णा शेडवर काम करत आहेत. त्यांना सरासरी दिवसाला पाचशे ते सातशे इतकी मजुरी मिळते. मजुरांच्या मजुरीची रक्कमेची फक्त हंगामातील शंभर दिवसांची उलाढालच अडीच ते तीन अब्ज इतकी होते.
 वार्षिक म्हणण्यापेक्षा वर्षातील चार महिन्यात बेदाणा व्यवसायातील अब्जावधी रुपयांची उलाढाल व परदेशी चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आणखी वाढण्यासाठी व अधिक उच्च दर्जाचा बेदाणा उत्पादन होण्यासाठी या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळण्याची गरज आहे. शासनाने या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिला तर उत्पादकांना बँकाद्वारे मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळेल ज्यामुळे अधिक चांगला व प्रमाणात बेदाणा निर्मिती शक्य होईल. मजूरांना अधिक रोजगार मिळून त्यांचे जीवन योग्य प्रकारे घडू शकेल.
 या सर्वांचा विचार शासकीय यंत्रणांनी करावा आणि बेदाणा निर्मिती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणी बेदाणा उत्पादकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button