कारगिलच्या लढाई मध्ये शहीद झालेले जवान सुरेश देशमुख यांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा.

सांगोला(प्रतिनिधी)-सांगोला तालुक्यांतील सोनद येथे सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कारगिलच्या लढाई मध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकमेव शहीद झालेले जवान सुरेश आप्पासाहेब देशमुख यांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहण्यात आली.शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सदैव सैनिकांचे सातत्य लाभो आणि त्यांची उणीव भरून निघावी तसेच नवीन पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळावी या हेतूने आयोजन त्यांच्या गावी करण्यात आले होते.
यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, काँग्रेस पक्षाचे अॅड. कांबळे, युवा नेते जगदीश बाबर यांनीही आपले विचार सैनिकाविषयी असणारा आदर आपल्या भाषणातून व्यक्त केला. तसेच माजी सैनिक कल्याणकारी संघटना सांगोला यांचे अध्यक्ष आणि आपले मनोगत मनोगत व्यक्त करताना आलेले वेगवेगळे युद्धातील प्रसंग सांगितले .
या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सोलापूर हून माजी सैनिक सहा.कल्याण अधिकारी श्री अर्जुन कोडग, सांगोला माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब साळुंखे आणि सर्व पदाधिकारी, सोनंद गावाचे आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र काशीद, सचिव मुरलीधर ठोकळे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, सब इन्स्पेक्टर काशीद, सोनंद गावचे सरपंच, माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचे युवा नेते सागर पाटील. सतीश काशीद, ग्रामसेवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ माजी सैनिक आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे राजकीय, सामाजिक नेतेमंडळी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक , माजी सैनिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. कारगिल दिवसाचे नियोजन आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था सोनंद यांचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले होते.