जुजारपूर येथे लोणारी समाज बांधवांच्या वतीने आ जयकुमार गोरे यांचा सत्कार सोहळा संपन्न…

सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे सांगोला तालुका लोणारी समाज बांधवांच्या वतीने  पितामह समाज रत्न
विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली असल्यामुळे विधानसभेत आवाज उठवणारे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार जयकुमार गोरे यांचा लोणारी समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांच्यासह सर्व लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले सांगोला तालुका लोणारी समाज बांधवांच्या वतीने माझा सत्कार झाला मनस्वी आनंद झाला यापुढील काळात समाजासाठी अहोरात्र झटणार आहे समाजाचा विषय येतो त्यावेळी राजकारण आणायचं नाही सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करायचं महाराष्ट्रातील लोणारी समाजाची गेले अनेकदिवसांपासून मागणी प्रलंबित होती. याच आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू असे आश्वासित केले होते. व त्या अनुषंगाने शासनाने मंत्रालयांमध्ये बैठक देखील आयोजित केली होती. महाराष्ट्रातील लोणारी समाजातील समाज बांधव हे महामंडळ स्थापन व्हावे याकरता प्रयत्नशील होते. या सर्वांच्याच प्रयत्नांना यश येऊन अखेर समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आजच्या कॅबिनेटबैठकीमध्ये मंजूर करण्यात आली आहे. यापुढील काळात सर्व लोणारी समाज बांधवांनी यावरच न थांबता सर्वांनी मिळून पाठपुरावा करूया असे आ जयकुमार गोरे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड सचिन देशमुख म्हणाले राज्यातील अनेक आमदारांनी आपली पत्रे राज्य शासनाकडे देऊन या मागणीस पाठिंबा दिला होता. अनेक आमदारांनी विधिमंडळामध्ये देखील ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी रेटून धरली होती.  सर्वच नेते मंडळी यांनी ही या साठी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील बहुतांश आमदार महोदय मंत्री महोदय आणि लोणारी समाजाच्या एकजुटीचा हा निर्णायक विजय झाला असून हे महामंडळ स्थापन झाल्यामुळे लोणारी समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे.त्यामुळे ज्या ज्या राजकीय सामाजिक व अराजकीय नेतेमंडळी तसेच सर्व समाज बांधवांनी केलेल्या सम
र्पित व निरपेक्ष भावनेने केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून हे महामंडळ आज स्थापन झाले आहे असे ऍड देशमुख यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर अध्यक्ष संतोष करांडे, सचिव दत्तात्रय नरळे, सुदर्शन घेरडे, विष्णू हिप्परकर, दिलीप हिप्परकर,सदाशिव करांडे,विश्वास करडे,उमाजी बजबळकर, विशाल नरळे, शामराव बजबळकर, मोहन कुटे, तानाजी खिलारे,हनुमंत बजबळे समाधान हिप्परकर,आप्पा हिप्परकर काका गोडसे,प्रकाश करांडे,आबा करांडे,दादा घेरडे,गणेश कारंडे दुर्योधन घेरडे संपत करांडे राजू करांडे सागर बजबळे यांच्यासह लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार युवक नेते दुर्योधन हिप्परकर यांनी मांनले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button