शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा तहसीलदार -संजय खडतरे

नाझरे (प्रतिनिधी):-नाझरे विद्यामंदिर नाझरे ता सांगोला येथे तहसील कार्यालय सांगोला अंतर्गत शासन आपल्या दारी या जनकल्याण योजनेचा शुभारंभ तहसीलदार संजय खडतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने हा उपक्रम सुरू केला असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार संजय खडतरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.यावेळी कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, नवनाथ बनसोडे मुख्याध्यापक अमोल गायकवाड मंडल अधिकारी दादासो गावंदरे यांच्या शुभहस्ते अनेक दाखल्याचे वाटप करण्यात आले.
सदर योजनेत तलाठी यांच्याकडील सातबारा रेशन कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजना उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, पीएम किसान दुरुस्ती, कृषी अवजारे अपंग चेक वाटप, बी बियाणे वाटप तसेच ग्रामविकास महसूल कृषी महावितरण पशुसंवर्धन आरोग्य इत्यादी खात्यामार्फत चे दाखले सुविधा यांचे प्रत्यक्ष जागेवर वाटप करण्यात आले यावेळी अनेक नागरिक, महिला, अपंग, शेतकरी, विद्यार्थी यांनी या योजनेचा लाभ जागेवर मिळाल्याने आनंद व्यक्त केला.यावेळी नाझरे व परिसरातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार तलाठी किरण बाडीवाले यांनी मानले.