महाराष्ट्र

पहाट वारा ग्रुप मित्रमंडळी तर्फे विमा प्रतिनिधी दत्तात्रय बनसोडे यांचा सत्कार.

सांगोला:-सांगोला शहरातील विमा प्रतिनिधी दत्तात्रय बनसोडे यांना विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल लिमरा या आंतरराष्ट्रीय संस्थेचा इंटरनॅशनल क्वालिटी अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यामुळे पहाट वारा मॉर्निंग ग्रुपमधील सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन बनसोडे यांचा सन्मान केला.

सांगोला शहरातील इनामदार कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम संपन्न झाला. उद्योगपती सतीश रेवे यांनी प्रास्ताविक करताना बनसोडे यांच्या कार्याची व पुरस्काराची ओळख करून दिली. जीवन विमा किती आवश्यक आहे हे सांगून बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या.

ग्रुप मधील जेष्ठ सदस्य सुरेश फुले व सतीश रेवे यांच्या हस्ते बनसोडे यांना सन्मानित करण्यात आले.सत्काराबद्दल बनसोडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ.सुहास सलगर, डॉक्टर महादेव जगताप, अमोल काशीद, पोपट घोंगडे, संग्राम लवटे, नागेश भोसले, देवदत्त केदार, बंडू लेंडवे, घोडके सर, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button