जयवंतराव पाटील पतसंस्थेच्या चेअरमन पदी धनंजय पाटील यांची बिनविरोध निवड; तर व्हाईस चेअरमन पदी सौ.केतकी देशपांडे यांची निवड

महूद(ता.सांगोला) येथील जयवंतराव पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. यामुळे महूद येथील या पतसंस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज दिनांक 11/1 रोजी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.सांगोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी जयवंतराव पाटील पतसंस्थेच्या चेअरमन पदी धनंजय शिवाजीराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच यानंतर व्हाईस चेअरमन पदासाठी सौ.केतकी श्रीकांत देशपांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यानंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन, नूतन सर्व संचालक यांचा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस. सांगोलकर यांच्या हस्ते येतोचित असा शाल, श्रीफळ ,हार देऊन सत्कार करण्यात आला. व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी विजय खबाले,विठ्ठल बागल,उमेश पाटील,अशोक माने, राजेंद्र खांडेकर,किशोर महारनवर,चंद्रकांत शिंदे,रवींद्र कदम, प्रियांका गुरव आदी संचालक उपस्थित होते.तरुण उद्योजकांचा आधार असणाऱ्या या पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन बिनविरोध निवड प्रक्रिया अबाधित राहिली आहे.
तरुणांनी उद्योगी, व्यावसायिक बनून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा पर्यायाने गावाचा व समाजाचा विकास साधावा.या विचाराने कार्यरत असणाऱ्या या संस्थेचे खेळते भांग भांडवल एक कोटी तीस लाख रुपये आहे. सभासद कर्ज ७० लाख रुपये आहे. तर इतर बँकांमधील गुंतवणूक ३० लाख रुपये आहे.स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. समाजाच्या आर्थिक उन्नती सोबतच रक्तदान शिबिरे,क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन संस्थेच्या वतीने केले जाते. वृक्षारोपण, विद्यार्थी अभ्यासिकेला मदत या माध्यमातून ही संस्था सामाजिक बांधिलकी जपते आहे. या संस्थेच्या
चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.