नंदेश्वर (प्रतिनिधी)-नंदेश्वर ता- मंगळवेढा येथे सद्यस्थितीला उपकेंद्र असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने मंजुरी मिळाली असून यासाठी लवकरच जागा अधिग्रहीत करून सदर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जिल्हा नियोजन निधीतून झाल्यानंतर पदनिर्मिती स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
नंदेश्वर हे पंचक्रोशीतील मोठे गाव असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राअभावी रुग्णांची हेळसांड होत होती.त्यासाठी वारंवार विविध नेत्यांनी पाठपुरावा केला होता अखेर या लढ्याला यश आलेले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,गरोदर माता या सर्वांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून नंदेश्वर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सर्वात मोठी शासनाची सर्वसामान्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी मिळालेली आहे.
———————-
प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला.यासाठी सरपंच सजाबाई गरंडे व दादासाहेब दोलतडे यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींनी सहकार्य केले व मंजुरी आणली.
पै.अशोक चौंडे
शिवसेना(शिंदे गट) तालुकाध्यक्ष