सांगोला ( प्रतिनिधी):-
सोलापूर- कोल्हापूर- सोलापूर सुपरफास्ट रेल्वे सेवासह इतर महत्त्वाच्या रेल्वे सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ,मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मार्गावर वाढती प्रवाशांची मागणी प्रमाणे नवीन रेल्वे सेवा सुरू करून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी व मागणी विचारात घेता पुढीलप्रमाणे नवीन रेल्वे सेवा सुरू कराव्यात.
सोलापूर- कोल्हापूर रेल्वे सोलापूर येथून रात्री 10.45 च्या सुमारास दररोज सुरू करावी त्याचप्रमाणे कोल्हापूर येथून रात्री याच वेळी नियमित रेल्वे सेवा सुरू करावी. कोल्हापूर -तिरुपती रेल्वे सेवा पंढरपूर ,कुर्डूवाडी मार्गे सुरु करावी ,
मिरज- कुर्डूवाडी पॅसेंजर रेल्वेचा विस्तार कोल्हापूर पर्यंत करावा त्यामुळे व्यापारी भावीक भक्तांची सोय होणार आहे, सध्या एकेरी मार्ग (सिंगल लाईन) असल्याने अनेक वेळा गाड्यांना क्रॉसिंगकरिता तासोंतास थांबावे लागते भविष्यात गाड्यांची व रेल्वेचे ट्राफिक पाहता या कुर्डूवाडी -मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे. कलबुर्गी- कोल्हापूर रेल्वेस माढा, ढालगाव, कवठेमंकाळ ,सलगरे स्टेशनवर अधिकृतथांबे मंजूर करावेत अशी येथील स्थानिक नागरिक ,प्रवाशांनी मागणी अशोक कामटे संघटनेकडे केली आहे.
प्रलंबित कोल्हापूर -वैभववाडी या प्रलंबित लोहमार्गाचे काम सुरू करावे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण रेल्वे जोडण्याकरिता महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे,हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेल्यास मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र थेट जोडला जाणार आहे. देशातील रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना भाडेदारात पूर्वीप्रमाणे सवलत मिळावी. दादर- सातारा एक्सप्रेस दररोज सोडावी त्यामुळे पुणे ,मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. दादर-सातारा-दादर ही रेल्वे दररोज सुरू होण्याकरिता आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे.
या निवेदनाच्या प्रति मा. अश्विनी वैष्णव ,रेल्वेमंत्री भारत सरकार,खासदार प्रणिती शिंदे, मा. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील , आमदार शहाजीबापू पाटील,खासदार शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार नारायण राणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, पुणे यांनाही देण्यात आली आहे असल्याची माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने दिली आहे.