सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ संलग्न सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळ, सांगोला यांचे मार्फत सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील प्रगतीसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
यामध्ये इयत्ता पाचवी व आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी गणित संबोध, गणित प्राविण्य , गणित प्रज्ञा परीक्षा व इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी गणित पारंगत परीक्षा तसेच तालुक्यातील इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्या सत्कार समारंभाचे नियोजन दरवर्षी मंडळाच्या वतीने करण्यात येत असते.
सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाची नूतन कार्यकारणी निवड मीटिंग शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे माजी जिल्हाध्यक्ष नीलकंठ लिंगे , जिल्हा सचिव दत्तात्रय लोखंडे, शिवाजी चौगुले, आनंद खंडागळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यामध्ये तालुका अध्यक्ष श्री दिलावर नदाफ (नाझरा विद्यामंदिर नाझरा), तालुका सचिव श्री आण्णासाहेब गायकवाड (कडलास हायस्कूल कडलास), परीक्षा प्रमुख श्री दिनेश सुरवसे(ज्ञानदीप विद्यालय सांगोला), उपाध्यक्ष सौ वैशाली बेहेरे मॅडम(न्यू इंग्लिश स्कूल सांगोला), उपाध्यक्ष श्री जगन्नाथ माने (कोळा विद्यामंदिर कोळा), खजिनदार श्री वैभव कोठावळे(सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला), सहसचिव श्री. एकनाथ फाटे (श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी), प्रसिध्दी प्रमुख श्री. विजयकुमार भुईटे (जवाहर विद्यालय घेरडी), जिल्हा प्रतिनिधी श्री.शिवाजी चौगुले(सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला), जिल्हा प्रतिनिधी श्री.आनंद खंडागळे (चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली), जिल्हा सल्लागार श्री निलकंठ लिंगे(न्यू इंग्लिश स्कूल सांगोला), कार्यकारणी सदस्य – शरद धुकटे , उज्वला कुंभार मॅडम , सविता ठोंबरे मॅडम,मार्गदर्शक श्री दत्तात्रय लोखंडे, श्री प्रदीप धुकटे, श्री विजयकुमार जगताप, श्री जालिंदर गायकवाड. यांची निवड करण्यात आली.
उपस्थित सर्वांनी नूतन पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन केले.