सांगोला तालुका

शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे मा.विजयकुमार वाघमोडे यांना मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर.

शिवणे वार्ताहर-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ ,मुंबई यांचे तर्फे दिला जाणारा या वर्षीचा “राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार “शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांना जाहीर झाला आहे.

सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम जे.टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेज फैजपूर ता.यावल जि. जळगाव येथे काल आणि आज होत असलेल्या मुख्याध्यापक महा मंडळाच्या 62 व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री वाघमोडे सरांचे संस्था अध्यक्ष बबनराव जानकर,उपाध्यक्ष प्रकाश वाघमोडे,सचिव डॉ.राजेंद्र जानकर आणि सर्व संचालक मंडळ आणि स्टाफ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!