सावे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने नूतन भारत पांढरे यांचा सत्कार संपन्न.

सावे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने बामणी गावचे सुपुत्र व सध्या गोंदिया तालुका तिरोडा येथे पीएसआय म्हणून कार्यरत असलेले माननीय श्री भारत प्रकाश पांढरे यांची डी. वाय. एस. पी. या पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, सावे शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सावे या संस्थेचे खजिनदार माननीय श्री दिलीप सरगर सर ,सावे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आला.
सावे शिक्षण क्रीडा प्रसारक मंडळ सावे या संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने माननीय भारत पांढरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या सत्कार प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, लोकनियुक्त सरपंच माननीय श्री शिवाजी वाघमोडे, संस्थेचे खजिनदार माननीय श्री दिलीप सरगर सर, राहुल पांढरे, नवनाथ इंगोले ,सागर (भैया )सरगर ,महादेव वाघमोडे व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. व्यासपीठावरील इतर मान्यवरांचा सत्कार व स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले .सत्कार पर मनोगतात माननीय श्री भारत पांढरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती सांगितली. तसेच शिकण्याची आवड निर्माण करून आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो , त्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास ,सूक्ष्म नियोजन, जिद्द, चिकाटी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं त्यांनी सांगितले. शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असेल तर आपण कोठेही राहून तसेच कोणत्याही शाळेत शिकून यश प्राप्त करू शकतो हे ही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी पायल माने हिने आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर विद्यालयातील सहशिक्षक श्री. बर्गे सर यांनीही विद्यार्थ्यांनीआपल्या जीवनामध्ये अथक परिश्रम घेऊन अभ्यास केला तर असे भारत पांढरे सारखे अधिकारी आपल्या विद्यालयातूनही बनतील अशी आशा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक श्री नलवडे सर यांनी केले व या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.