जय श्रीराम च्या जयघोषाने नाझरे नगरी दुमदुमली, भव्य शोभायात्रा संपन्न, मैदानी खेळ आणि लक्षवेधले

जय श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या, भगवे ध्वज, आकर्षक रोषणाई, मैदानी खेळ व जय श्री रामाच्या जयघोषाने नाझरे नगरी दुमदुमली व भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मैदानी खेळाने सर्वांचे लक्ष वेधले, चित्त थरारक तलवारबाजी, दांडपट्टा, भाला फेक या खेळाने अवघे नाजरे नगरी राममय झाली. व सर्व घराघरात रामाचा नारा सर्वत्र दिसत होता.
भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गाण्याने सर्व तरुणांनी ठेका धरला व अबूतपूर्व आनंदाचे व भक्तिमय वातावरण पहावयास मिळाले. दुपारी बारा वाजता येत नाही भूमीत श्री ची फुले पडली यावेळी असंख्य राम भक्त उपस्थित होते. शोभायात्रा नाझरे गावातून शिस्तबद्ध निघाली या शोभायात्रेत समाजातील विविध घटकांनी सहभाग नोंदविला व सर्व तरुण मंडळी उपस्थित होते.
मिरवणुकीत श्रीराम, लक्ष्मण, सीता माय, भरत, हनुमान यांच्या रूपात लहान मुलांनी वेश परिधान करून रामायणातील प्रसंगाची आठवण करून दिली. प्रत्येकाच्या तोंडून श्रीरामाचा जयघोष आणि अंगावर भगवे वस्त्र परिधान केल्याने वातावरण भारावून गेले होते. संध्याकाळी घरोघरी राम दीप लावण्यात आले होते व श्रीरामाच्या जयघोषाने नाझरे गाव राम मय झाले होते.