सांगोला नगरपरिषदेमार्फत जागतिक अपंग (दिव्यांग) दिन साजरा

सांगोला नगर परिषदेमार्फत सांगोला शहराच्या हद्दीतील दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आले बाबत ची माहिती डॉ .सुधीर गवळी मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद सांगोला यांनी दिली. सदर कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या, समस्या व अडचणी यांवर चर्चा करण्यात आली.
सदर कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्री. स्वप्निल हाके, कर निरीक्षक श्री. रोहित गाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष नवीद पठाण, श्री अमोल लऊळकर, तय्यब बागवान तसेच शहरातील सर्व दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होते.
———————
दिव्यांग बांधवांना फक्त सहानभूतीची नाही तर आपुलकीची गरज आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे गरजेचे असून यासाठी व दिव्यांग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सांगोला नगरपरिषद कायम प्रयत्नशील राहील.
मुख्याधिकारी तथा प्रशासक,नगरपरिषद सांगोला.