बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चित्रमय चरित्राचे उद्घाटन

–
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजता प्रभातफेरीने झाली आहे.
आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक आठ वाजता श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली चित्रमय चरित्र दर्शनाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले.यावेळी देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड उपस्थित होते.
श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली चित्रपट चरित्र दर्शन बनविण्यासाठी माऊली भक्त महादेव नाडकर यांनी परिश्रम घेतले.या चित्रमय चरित्र दर्शनाच्या उद्घाटनानंतर माऊली गुरु बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात चित्रमय चरित्र दर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.