महाराष्ट्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कट्टर शिवसैनिक शंकर मेटकरी यांचेकडून एक वेगळा आदर्श

सांगोला(प्रतिनिधी):-हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रमुखांचे व शिवसेनेचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत व शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सांगोला तालुका शिवसेनेचे विधानभा समन्वयक शंकर मेटकरी यांनी स्वखर्चाने सामनाचे 200 अंक मागवून स्वतः वाटप करुन सर्वांपुढे एक वेगळा आदर्श तयार केला आहे.

शिवसेनेचे विधानभा समन्वयक शंकर मेटकरी हे शिवसेनेचा आवाज होऊन मराठी माणसासाठी विरोधकांशी प्राणपणाने लढणार्‍या सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे 200 अंक दरवर्षी स्वखर्चाने लोकांना वाटप करत असतात..याहीवर्षी त्यांनी अंक वाटपाच्या परंपरेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता  हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वखर्चाने सामनाचे 200 अंक मागवून पायी फिरत स्वतःवाटप करुन एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा प्रचार व प्रसार करण्याच काम प्रामाणिकपणे केले आहे.

एक शिवसैनिक संघटना वाढीसाठी निष्ठेच्या भांडवलावर पैशा व पदाशिवाय काम करु शकतो. शिवसेनेवर निष्ठा असल्यावर ते कोणत्याही माध्यमातून करता येत आणि ते शिवसैनिक शंकर मेटकरी हे सतत करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी पणाचे तालुक्यासह जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांमधून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button