सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये ‘कळी उमलताना ‘ कार्यक्रम संपन्न

सांगोला (प्रतिनिधी)*: सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरूवार, दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील मुलींसाठी ‘कळी उमलताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.राहुल बिराजदार उपस्थित होते.
    यावेळीआपल्या मनोगतात प्रा.राहुल बिराजदार म्हणाले, मुलींना आपल्या आरोग्याची  काळजी घ्यावी. यामध्ये मासिक पाळी, लैंगिक शिक्षण, मासिक पाळीतील त्रास व उपाय योजना या संबंधीचे सखोल मार्गदर्शन केले.
          सदर कार्यक्रमास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य सौ.शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभिषण माने,शिक्षिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा बेहेरे, सूत्रसंचालन प्रा.कु.विजया फुले तर सौ.शुभांगी घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!