नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार – आमदार शहाजी बापू पाटील

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला शहरासह तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी ५० लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे. शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वासूद केदार मळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न आला. त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली..

आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिर दुसरा मजला बांधकामासाठी ५० लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, शिवसेना शहर संघटक आनंदा माने, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, शिवसेना एससी आघाडी तालुकाप्रमुख दीपक ऐवळे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button