सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये सिनी. केजी या वर्गाची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये सिनी. केजी या वर्गाची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व पालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु कॉलेजचे प्राचार्य श्री.अमोल गायकवाड,इंग्लिश मेडिअमच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,सुकेशनी नागटिळक उपस्थित होत्या. या निमित्ताने बोलताना श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर म्हणाले की, सांगोला विद्यामंदिरच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे विद्यामंदिर हे संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला आले आहे.विद्यार्थ्यांची प्रगती हेच आमचे ध्येय आहे व ही गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात. आणि या जोरावरच सांगोला विद्यामंदिर या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल हे चांगल्या पध्दतीने काम करत असून अशीच गुणवत्ता उत्तरोत्तर वाढत जावो ही अपेक्षा व्यक्त केली.तत्पूर्वी सुरूवातीला विद्यालयाची विद्यार्थीनी कु.रूद्राणी जाधव हीने कथक नृत्याच्या माध्यमातून गणेश वंदना सादर केली तसेच कु. दिव्या दुगेश्वर व काव्या शर्मा यांनी वेलकम डान्स सादर केला. या नंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा दिला.
यानिमित्ताने विद्यालयातील पालक आश्विनी जाधव,पूनम राजमाने मॅडम, समाधान माळी यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नर्सरी ते सिनी . केजीला अध्यापन करणारया शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात सादर केलेल्या उपक्रमांची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा गुळमिरे यांनी केले.तर लक्ष्मी स्वामी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.



