पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ बॉक्सिंग संघाच्या सराव शिबिरास सुरुवात

सांगोला शहरातील क्रीडा क्षेत्रा साठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मुलांच्या बॉक्सिंग शिबिरास सुरुवात झालेली आहे.
हे सराव शिबिर दिनांक 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत सकाळ व सायंकाळ दोन सत्रांमध्ये होणार असून या सर्व शिबिरार्थी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार यांचे मार्गदर्शन तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलानी यांचे सहकार्य लाभणार आहे. दिनांक 25 ते 27 डिसेंबर 2023 रोजी चंदिगड विश्वविद्यालय मोहाली येथे पश्चिम व दक्षिण विभागीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे
सराव शिबिरातील खेळाडू पुढीलप्रमाणे:-अमोल नानासो अमोने ( डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला ) शुभम अनिल बनसोडे (एस.एम. कॉलेज अकलूज) ओम सुनील वाघमारे ( गरड महाविद्यालय मोहोळ ) सुहास नेमिनाथ घायाळ ( मोडनिंब ) धनाजी गोडसे ( उमा कॉलेज पंढरपूर ) संकेत रतिलाल नाईकवाडे ( के.बी.पी कॉलेज पंढरपूर ) श्रीराज चंद्रशेखर घोंगडे ( गरड महाविद्यालय मोहोळ ) रामेश्वर तुकाराम येलगुंडे ( के.एन.भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी ) व संघाचे प्रशिक्षक प्रा. विजय पवार डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व संघ व्यवस्थापक प्रा.विजय दत्तू संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा