जयहिंद (मा. सै.) नागरी सहकारी पतसंस्थेचे नवीन सभासदत्व देणे व शेअर्स विक्री ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत सुरू

सांगोला :- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या जयहिंद (मा.से.) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला तालुका या संस्थेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार शेअर्स धारण करण्याबाबतच्या अटी व शर्ती नमूद असून त्यानुसार संस्थेचे नवीन सभासदत्व देणे व नवीन शेअर्सची विक्री सुरू असून ती विक्री व सभासदत्व धारण करणे हे दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर सुरू राहणार आहे. तरी सभासदत्व घेण्यास व शेअर्स खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व ग्राहकांनी संस्थेची नवीन सभासद होऊन शेअर्स विक्रीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी केले आहे.
तसेच याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्ड झेरॉक्स व फोटो सोबत आणून केवायसीची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन सभासद होण्यासाठी व शेअर्स खरेदी करण्यासाठी ३००० रुपये एवढी शेअर्स रक्कम, प्रवेश फी १०० रुपये, फॉर्म फी ६० रुपये, सेव्हिंग खाते १०० रुपये भरून आपली योग्य कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत व सभासद व्हावे, शेअर्स खरेदी करावे तसेच ज्या सभासदांची शेअर्स रक्कम ही ११०० रुपये आहे त्या सर्व सभासदांनी उर्वरित स्वकम भरून आपली शेअर्स रक्कम ३००० रूपये करून घ्यावी. तसेच अधिकच्या माहितीसाठी ८४४६९५८००१ या नंबरवरती संपर्क साधावा असे पतसंस्थेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी सांगितले आहे.