लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंदमध्ये आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंदमध्ये आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दि.1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था सदस्या सौ.रजनी भोसले मॅडम व श्री. मनोहर गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमधून श्रेया ढगे, राजवर्धिनी बाबर, स्वरा कोकाटे , विरा कोकाटे यांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली.
या कार्यक्रमानिमित्त प्राचार्य श्री.हेमंतआदलिंगे सर,मुख्याध्यापिका पुष्पा महाकाळ मॅडम, पर्यवेक्षक श्री. सुभाष आसबे सर , सौ.सुषमा ढेबे मॅडम सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते