असंख्य ग्राहकांच्या साक्षीने सूर्योदय मॉल अँड वस्त्र निकेतन चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न ; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो ग्राहकांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 42 हजार स्क्वेअर फुटांमध्ये उभारलेले सर्वात मोठे खरेदीदालन म्हणून उदयास आलेले सांगोला शहरातील सूर्योदय मॉल अँड वस्त्र निकेतन या दालनाचा भव्य शुभारंभ घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी सांगोला तालुक्यासह मंगळवेढा ,पंढरपूर ,आटपाडी , जत व कवठेमहनकाळ तालुक्यातील हजारो ग्राहकांनी प्रचंड गर्दी करत खरेदीचा आनंद घेत शुभेच्छा दिल्या.
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या काही भागांमध्ये कार्यरत असलेला सूर्योदय उद्योग समूह असून या उद्योग समूहाची सुरुवात सांगोला तालुक्यामधून गेली तेरा वर्षांपूर्वी झालेली आहे. या उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले त्याचबरोबर सहसंस्थापक श्री जगन्नाथ भगत गुरुजी डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी या चार तरुणांनी उद्योगांच्या माध्यमातून आजवर हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिलेले आहे. वित्तीय संस्था असतील दुग्ध व्यवसाय असेल कृषी सह अनेक व्यवसायांच्या माध्यमातून उद्योग आणि व्यवसायांची एक मोठी चळवळ उभी केलेली असून विविध व्यवसायांच्या माध्यमातून सुमारे दीड लाखाहून अधिक समाधानी ग्राहकांशी एक अतूट नाते निर्माण केलेले आहे.
आजच्या या शुभारंभ सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल दादा सावंत, उद्योजक भाऊसाहेब रुपनर, युवा नेते डॉ. पियुष दादा साळुंखे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल मालक पवार, आटपाडी तालुक्यातील नेते अनिल पाटील, युवा नेते गुंडा दादा खटकाळे, मंगळवेढ्याचे माजी सभापती तानाजी काकडे, दामाजी कारखान्याचे संचालक बसवेश्वर पाटील, माजी सभापती संभाजी गावकरे, सांगोल्याचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, तासगावचे उद्योजक सचिन माळी, अथणीचे उद्योजक मारुती माळी, मोहोळचे उद्योजक प्रमोद अवताडे यासह विविध तालुक्यातील गावो गावचे आजी-माजी पदाधिकारी व जनसामान्य नागरिक यांच्यासह हजारो ग्राहकांनी शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूर्योदय मॉल अँड वस्त्र निकेतन या खरेदी दालना मध्ये कपड्यांमधील सर्व प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध असून होलसेल दरामध्ये रिटेल विक्री हे या मॉलचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. शालू साड्यांमधील सर्व व्हरायटी लेडीज वेअर मीन्स वेअर किड्स शूटिंग शर्टिंग लिनन कॉटन यासह नवरदेव आणि नवरी साठी बस्ता बांधण्याची विशेष सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. कपड्यांमधील विविध व्हरायटीसह महाराष्ट्रात कदाचित कुठेही उपलब्ध नसेल अशा पद्धतीचे शाही डेकोरेशन येथे पाहायला मिळते. त्याचबरोबर बाजार विभागामध्ये स्वच्छ व निवडलेला किराणा, भुसार, बिस्किट्स ,ऑइल ,डिटर्जंट , स्टेशनरी ,बॅगेज, क्रोकरीज, स्टील हाऊस ,प्लास्टिक हाऊस, गिफ्ट हाऊस आणि फुटवेअर यासारख्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत.
अनुभवी प्रशिक्षित व विनम्र आणि सेवाभावी असा कर्मचारी वृंद, सुमधुर संगीत, प्रत्येक वस्तूंवरती बायवन – गेटवन सह विविध प्रकारच्या ऑफर्स, सुसज्ज पार्किंग आणि अत्यंत माफक दर अशा प्रकारची वैशिष्ट्ये इथे दिसून येतात. सूर्योदय उद्योग समूहाने आत्तापर्यंत सुमारे वीस ते पंचवीस प्रकारच्या फर्मच्या माध्यमातून अनेकविध व्यवसाय करत व्यवसायातील सचोटी, गुणवत्ता तसेच आपला सेवाभाव व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून या मॉल आणि वस्त्र निकेतन ला ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळलेली दिसून येत आहे. ग्राहकांशी नाते जोडणे आणि व्यवसाय वृद्धी या दृष्टिकोनातून या मॉल आणि वस्त्र निकेतन मध्ये प्रत्येक दोन हजारांच्या खरेदीवर एक भाग्यवान कुपन दिले जात असून 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत ही योजना उपलब्ध असून येत्या मकर संक्राती दिवशी याची सोडत काढण्यात येणार आहे. प्रथम बक्षीस अल्टो कार यासह इलेक्ट्रिक बाइक, एलईडी, वॉटर एक्वागार्ड ,सायकल ,मिक्सर , कुकर आणि घड्याळे यासारखी तब्बल 251 बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व ग्राहकांचे सूर्योदय उद्योग समूहाच्या वतीने आदराने स्वागत करण्यात आले.
———————————-
माफक दर ,मालाची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास …. गेली तेरा वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये आजवर केलेल्या उद्योग आणि व्यवसायामधून ग्राहक हीच देवता समजून त्यांचा विश्वास जपण्याचे काम आम्ही करत आलो आहोत. सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतन च्या या खरेदी दालनामध्ये माफक दर आणि मालाची गुणवत्ता सांभाळत ग्राहकांची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. ग्राहकांनी आमच्यावरती टाकलेला प्रचंड विश्वास निश्चितपणे सार्थ करू.
अनिल इंगवले, संस्थापक सूर्योदय उद्योग समूह.