सांगोला तहसील यांच्याकडून अनाधिकृत माती उत्खनन दंड वसुलीस टाळाटाळ-इंजि.अशोक आबा नरळे

कोळा(जगदिश कुलकर्णी):- सांगोला तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचेकडून अनाधिकृत आणि बेकायदा उत्खनन करुन मातीची विक्री केलेबाबत दोन नोटीस बजावणेत आल्या होत्या. या दोन्ही नोटीसीद्वारे तब्बल रक्कम रुपये दोन कोटी, एकोणतीस लाख, एकेचाळीस हजार, शंभर रुपये दंडासहित भरणेबाबत नोटीस बजावून सुद्धा बरेच महिने उलटून गेले आहेत. तरी अद्याप दंडाची रक्कम वसूल झालेली सरकारी दप्तरी दिसून येत नाही. तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी इंजि.अशोक आबा नरळे यांनी केली आहे.
नियमबाह्य उत्खननामुळे आजूबाचूच्या शेतकरी वर्गाची शेत जमीन कसण्यायोग्य राहिलेली नाही. त्यामुळे शेतजमीन पडीक ठेवणेची वेळ शेतकरी बांधवावर आलेली आहे. अशा नियमबाह्य उत्खननामुळे शेतकरी वर्गाचे अर्धिक नुकसान झाले आहे ते सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून मिळाले पाहीजे ही तक्रारदार इंजि.अशोक आबा नरळे यांची मुख्य मागणी आहे.
बळीराजाने वीजबिल वेळेत भरले नाही म्हणून तातडीने सुलतानी कारवाई करणार्या प्रशासनाकडून एवढी मोठी रक्कम अद्यापपर्यंत वसूल न केली गेल्याने प्रशासनाबद्दल तालुक्यातील नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.