प्रतिकूल परिस्थितीतही जिंकण्याची वेगळीच मजा असते- मारुती रणदिवे

नाझरा(वार्ताहार):- आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यांवर मात करत आपण पुढे गेले पाहिजे,शालेय जीवनात असताना अनेक कठीण परिस्थितीतून मलाही जावे लागले, खरंतर त्या कठीण परिस्थितीनेच मला घडवले.प्रतिकूल परिस्थितीतही एखादे यश साध्य करता येणे यासारखे दुसरे कोणतेच वैभव आपल्या जीवनात नाही म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीत ही जिंकण्याची मजा वेगळीच असते., असे प्रतिपादन मुंबई येथील जीएसटी चे उपायुक्त व नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थी मारुती रणदिवे यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेत सुरू असलेल्या सायकल बँक साठी त्यांनी दहा सायकली प्रधान केल्या होत्या,.या कार्यक्रमात प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ रणदिवे, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,युवा विधीज्ञ लवटे-पाटील,रविराज शेटे,व इतर मान्यवर उपस्थित होते., पुढे बोलताना मारुती रणदिवे म्हणाले की,या शाळेतल्या सर्व गुरुजनांनी मला घडवले त्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो.जीवनात येणाऱ्या प्रत्येक खडतर परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जावे याचे उत्तम आणि उत्कृष्ट मार्गदर्शन या शाळेने मला दिले.येथील गुरुजनांचा आदरयुक्त दरारा आजही माझ्या मनात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन भोसले यांनी केले तर आभार सुनील जवंजाळ यांनी मांनले.