सांगोला तालुका

थकबाकीदारांनी वेळेत थकबाकी भरून नगरपालिकेस सहकार्य करावे : मुख्याधिकारी केंद्रे

सांगोला(प्रतिनिधी):-सन 2021- 22 अखेर 20 हजार 323 खातेदारांकडून थकबाकी वसुलीमध्ये एकूण 10 कोटी 81 लाख 4 हजार पैकी आज अखेर 1 कोटी 38 लाख 64 हजार रुपये वसुली केली आहे. उर्वरित 9 कोटी 42 लाख 40 हजार रुपये थकबाकी वसुलीसाठी सांगोला नगरपालिकेकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 1 हजार 506 करदात्यांना नगरपालिकडून नोटीस बजविण्यात आले आहेत. थकबाकीदारांनी वेळेत आपली थकबाकी भरून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
सांगोला नगरपालिका अंतर्गत एकूण 13 हजार 963 मालमत्ता धारक आहेत. तर 5 हजार 787 नळ कनेक्शन तसेच 363 गाळे धारक धारक आहेत. यासह 210 खुल्या जागा धारक आहेत. या नगरपालिकेच्या मालमत्ता धारक, नळ कनेक्शन धारक आणि खुला जागा तसेच गाळा धारक असे एकूण 20 हजार 323 खातेदारांकडून नगरपालिकेची कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये सन 2021- 22 अखेर थकबाकीदार असलेल्या नळ कनेक्शन, गाळा भाडे, खुला जागा भाडे तसेच मालमत्ता धारक असे एकूण 1 हजार 506 थकबाकीदार करदात्यांना नगरपालिकडून नोटीस बजविण्यात आले आहेत. यापुढील काळात उर्वरित थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर सुरू असून, शहर आणि उपनगरामध्ये वसुली पथकामार्फत थकबाकी जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी नगरपालिकेच्या या वसुली मोहीम पथकास सहकार्य करून आपली थकबाकी भरून घ्यावी असे आवाहन या वसुली पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सांगोला नगरपालिकेकडील मालमत्ता धारकां कडील मागील थकबाकी 2 कोटी 70 लाख 17 हजार आहे. यामध्ये चालू थकबाकी 2 कोटी 20 लाख रुपये असे एकूण 4 कोटी 90 लाख 17 हजार रुपये थकबाकी पैकी आजअखेर 73 लाख 49 हजार वसुली करण्यात आली आहे. सन 2022-2023 मध्ये पाणीपट्टी साठी मागील थकबाकी 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये असून चालू 1 कोटी 80 लाख रुपये आहे. असे एकूण 3 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांचे उद्दिष्ट आहे. पैकी आजअखेर 48 लाख 70 हजार रुपये वसुली करण्यात आली आहे.
इमारत व गाळा भाडे यामध्ये 1 कोटी 86 लाख 44 हजार रुपयांचे वसुली चे उद्दिष्ट आहे. पैकी आजअखेर 16 लाख 45 हजार वसुली करण्यात आली आहे. उर्वरित वसुलीसाठी पथक कार्यान्वित करण्यात आले असून या वसुली पथकाच्या माध्यमातून पाणीपट्टी 534 थकबाकीदारांना तर 972 घरपट्टी थकबाकीदारांना असे एकूण 1 हजार 506 थकबाकीदारांना नगरपालिकडून नोटीसा बजावण्यात आले आहेत. उर्वरित थकबाकीदारांना नोटीसा बजाविण्याची प्रक्रिया सुरू असून थकबाकीदारांनी वेळेत थकबाकी भरून नगरपालिकेच्या होणार्‍या पुढील कारवाई पासून बचाव करावा. तसेच आपली थकबाकी भरून नगरपालिका प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!