नाझरा विद्यामंदिर प्रशालेत कैलासवासी बाईसाहेब झपके यांना अभिवादन

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा व सांगोला नगरपरिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा कै. शोभनतारा चंद्रशेखर झपके उर्फ बाईसाहेब यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त नाझरा विद्यामंदिर मध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्या हस्ते कै. बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रशालेतील शिक्षक दीपक शिंदे यांनी बाईसाहेबांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.