सांगोला तालुकाक्रीडाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरच्या प्रतीक्षा येलपलेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम

सांगोला (प्रतिनिधी ) दिनांक २९ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर (विसापूर) जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील कुमारी प्रतीक्षा दत्तात्रय येलपले ११ वी शास्त्र ब हिने १९वर्षे मुली वयोगटामध्ये गोळाफेक स्पर्धेमध्ये ११.५७ मिटर गोळाफेक करून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला व ती पुढील चंद्रपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तसेच कुमारी दिपाली बसवंत दोलतोडे हिने विभागस्तरावर भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत २४.२९ मीटर भालाफेक करुन सहावा क्रमांक मिळविला.

वरील यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.डी.के पाटील,नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर,प्रा.संतोष लवटे,प्रा.सचिन चव्हाण,अन्सार इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले.

 

वरील यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थां सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
या यशाबद्दल खजिनदार शंकरराव सावंत सर,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके ,संस्था कार्यकारिणी विश्वेशजी झपके,सर्व अध्यापक,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!