पाचेगांव खुर्द येथे मराठ्यांचा भव्य रास्ता रोको वाहन चालकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय; मराठा आंदोलनाचा स्तुत्य उपक्रम

पाचेगांव/प्रशांत मिसाळ:
पाचेगांव खुर्द येथे काल गुरुवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाकडून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सांगोला तालुक्यात मराठा समाजाकडून सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन कारम्यात आले. यामध्ये पाचेगांव खुर्द, हातीद आणि तिप्पेहळ्ळी येथील मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी नागपूर महामार्गावर पाचेगांव खुर्द येथील राजश्री हॉटेलच्या समोर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगलीकडून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आंदोलकांकडून थांबलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांनी मराठा समाजाच्या या उपक्रमाची स्तुती केली. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी उपस्थित समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी सविस्तर माहिती सांगितली.
मराठा समाजाकडून शांततेत पार पडलेल्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल मराठा समाजाने पोलिसांचेही आभार मानले. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडलाधिकारी वर्षा बरबडे, तलाठी बाळासाहेब शिंदे व तलाठी राजेंद्र शिर्के यांनी निवेदन स्वकारले.
आमदार शहाजीबापू पाटील, दिपकआबा साळुंखे पाटील आणि डॉ. बाबासाहेब देशमुख तुम्हाला जर मराठ्यांच्या मताची गरज असेल तर आपापल्या पदांचे तात्काळ राजीनामे द्या तरच मराठ्यांच्या मनात तुमचं स्थान अबाधीत राहील.