सकल मराठा समाज सांगोलाच्यावतीने रास्ता रोको संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज सांगोलाच्यावतीने तालुक्यात विविध ठिकाणी गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको संपन्न झाला. यावेळी सरकारचा निषेध केला. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकुडे, तहसीलदार कणसे व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी निवेदन स्विकारले.
मराठा समाजाला २४ऑक्टाेबर पर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थात व आरक्षणासाठी गेली सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देणेसाठी मराठा समाजाने आज रस्तारोको आंदोलन केले.सांगोला तालुक्यात वाढेगाव नाका, सोनंद, कडलास, आलेगाव, मिरज रोड टोल नाका, पाचेगाव, .मेथवडे फाटा, महूद, घेरडी, डोंगरगाव, वाकी आदी ठिकाणी रास्ता रोको करून वाहतूक रोखण्यात आली. आंदोलनात मराठा समाजासोबत विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रास्तारोको प्रसंगी मराठा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणुन सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.