मराठा आरक्षणास सांगोला विरशैव लिंगायत समाजाचा पाठिंबा
सांगोला(प्रतिनिधी):-महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास सांगोला येथील वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने आज गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी पाठिंबा देण्यात आला.यावेळी प्रांतिक सदस्य प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, अध्यक्ष मनोज उकळे सर, सचिव श्री. नरेंद्र होनराव, खजिनदार श्री. संतोष गुळमिरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. मनोज जरांगे पाटील यांनी मोजे आंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे सुरु केलेल्या मराठा आरक्षणाला महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधवांचा पाठिंबा असून हे आंदोलन दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास वीरशैव लिंगायत समाजाचा अधिकृतरित्या मागण्या व आंदोलनास संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे.