हरभरा व गहू पिकाचे परमिटवर अनुदानित प्रमाणित बियाणे वाटप सुरू
सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते कि कृषि विभागाकडुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा ( फुले विक्रम व फूले विक्रांत ) व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्राम बिजोत्पादन अंतर्गत गहू ( MACS-6222, HI-1544 पुर्णा) या रब्बी पिकांचे प्रमाणित बियाणे अनुदानामध्ये परमिटवर उपलब्ध करून देणेत येत आहे.
तरी ईच्छुक शेतकरी बांधवांनी कृषि सहाय्यक यांचेकडुन बियाणासाठीचे परमिट घेऊन महाबिज चे अधिकृत वितरक खरेदी विक्री संघ सांगोला व शेतकी भवन सांगोला यांचेकडुन अनुदान वजा करून येणारी रक्कम भरून खरेदी करावे.
अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभाग सांगोला यांचे कडून करण्यात आले आहे.