जवळे:- सोनंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सोनंद मधील विद्यार्थी कु. गळवे दिक्षा गुंडा व कु. गायकवाड प्रतिक्षा प्रताप यांनी भूगोल विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना या वर्षीचा भूगोल रत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदरचा पुरस्कार आताच पी.एस. आय. झालेल्या सोनंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनी कु. काजल दबडे मॅडम व तसेच कॅप्टन डि . के. काशिद, मेजर रामचंद्र काशीद, मेजर मुरलीधर ठोकळे, सुभेदार गजानन कुलकर्णी या माजी सैनिकांच्या हस्ते देण्यात आला. गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सदर पुरस्कार सोनंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे भूगोल विषयाचे प्राध्यापक श्री आल्ताफ नदाफ सर यांच्याकडून दरवर्षी दिला जातो.
सदर पुरस्कार देतेवेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच सोनंद हायस्कूलचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते या पुरस्कारामुळे सदर विद्यार्थिनीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे .