सांगोला तालुका

अज्ञात व्यक्तीने फोन करून केली फसवणूक; बँक खात्यातून 82 हजार 882 लांबविले

सांगोला (प्रतिनिधी):- मोबाईल कॉल करून स्नॅप डील कडून खरेदी केल्यावर सवलत आहे असे म्हणून प्ले स्टोअर वर जावून अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून तसेच मोबाईलवर बोलण्यात गुंतवून ठेऊन बँक खात्यातून परस्पर 82 हजार 882 रुपये ट्रान्स्फर केल्याची घटना रविवार दि.26 नोव्हेंबर रोजी सांगोला शहरात घडली आहे.

मुकुंद राजाराम भोसेकर रा.स्टेशन रोड सांगोला यांनी स्नॅप डील वरून काही कपडे खरेदी केले होते. आजही त्यांनी स्नॅप डील वरून काही कपडे मागवले होते दरम्यान मुकुंद भोसेकर यांना रविवार दि.26 रोजी अनोळखी व्यक्तीचा मोबाईल वरून कॉल आला की स्नॅप डील वरुन आपणास 50 रू.सवलत आहे तुम्ही दोन रू.फोन पे करा व प्ले स्टोअरवर जावून एक अ‍ॅप डाऊनलोड करा त्यांनी विश्वास ठेऊन अ‍ॅप डाऊनलोड केले असता त्यांच्या स्टेट बँक खात्यातून 21 हजार 471 व परत लगेच 61 हजार 411 असे एकूण 82 हजार 882 रुपये कट झाल्याचे मेसेज आले.

 

त्यांनी आलेला  मेसेज पाहिला असता त्यांच्या खात्यातून 82 हजार 882 रुपये कट झाल्याचे निदर्शनास आले व  अज्ञात व्यक्तीने फोन करून आपली फसवणूक झाल्याचे समजले याबाबत मुकुंद भोसेकर यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध सांगोला पोलिसात धाव घेऊन सायबर सेल कडे गुन्हा नोंद केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!