सांगोला तालुकाराजकीय

कोळा येथे रविवारी मा. आम. दिपकआबांचा भव्य नागरी सत्कार…!; रयत शिक्षण संस्थेवर निवड झाल्याबद्दल कोळा वासीयांकडून आबांचा होणार गौरव

नेहमीच सामान्य लोकांच्या हितासाठी आणि प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची नुकतीच पेट्रोनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रयत सारख्या लोकप्रिय शिक्षण संस्थेत आपल्या हक्काचा माणूस नियुक्त झाल्याबद्दल कोळा ता. सांगोला येथे रविवार दि ५ मार्च रोजी सायं. ५ वा. अर्जुन चौक, कोळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे.
संपूर्ण कोळा आणि तालुक्याचे शक्तीपीठ असलेल्या १०८ श्री.श्री.श्री.रूद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्याहस्ते मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे पवार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार लहू कांबळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
कोळा आणि साळुंखे पाटील परिवार हे सबंध नेहमीच सलोख्याचे आणि सख्याचे राहिले आहेत. कोळा परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात साळुंखे पाटील परिवार नेहमीच प्रकर्षाने सहभागी असतो. त्यामुळे या परिसराने नेहमीच आपल्या कुटुंबातील एक सदस्य याच नात्याने मा आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर निरपेक्ष भावनेने प्रेम केले आहे. याच प्रेमातून रविवारी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या नागरी सत्कार समारंभास कोळा आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!