sangolamaharashtra

निवृत्ती वेतनधारकांना फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन

सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) रणजित कदम यांनी केले आहे.

 

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्ती वेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत कोषागार कार्यालया मार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. किंवा ऑनलाइन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही.

निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी. अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाइन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून आलेल्या कॉल्स किंवा संदेशाला प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जवाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) रणजित कदम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!