न्यू इंग्लिश स्कूल, जूनियर कॉलेज सांगोलामधील निसर्ग फुलेची गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तरीय प्रथम पन्नास विद्यार्थ्यांमध्ये निवड

महाराष्ट्र राज्य जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत गणित प्रज्ञा परीक्षा 11 फेब्रुवारी 2024रोजी सोलापूर येथे घेण्यात आली. या परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या इयत्ता पाचवीच्या दोन विद्यार्थ्यांची व इयत्ता आठवीच्या तीन विद्यार्थ्यांची गणित प्राविण्य परीक्षा मधून गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झालेली होती.
त्यापैकी इयत्ता पाचवी मधील कुमार. निसर्ग चैतन्य फुले याची महाराष्ट्र राज्यातील प्रथम 50 विद्यार्थ्यांमध्ये (गोल्डन कॅटेगिरी) निवड झाली आहे विशेष म्हणजे सांगोला तालुक्यातील तो एकमेव विद्यार्थी आहे की ज्याची शिष्यवृत्ती व पदक साठी निवड झालेली आहे. तसेच इयत्ता आठवी मधून कु. समृद्धी विष्णू माळी आणि कुमार .विदाद जमीर शेख यांची गणित प्रज्ञा प्रमाणपत्रधारक विद्यार्थी(सिल्वर कॅटेगिरी) म्हणून निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना सौ.मुजावर मॅडम आणि सौ.आदलिंगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
काठिण्य पातळी जास्त असणार्या गणिताच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी राज्यात ठसा उमटवला दैदिप्यमान यश मिळवले म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य केशव माने सर, पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,पर्यवेक्षक दशरथ जाधव, पर्यवेक्षक प्रा.संजय शिंगाडे संस्था अध्यक्ष,संस्था सचिव व सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.