महाराष्ट्रसांगोला तालुका

मे गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्यावतीने वृक्षारोपण व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार

मे गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्यावतीने काल सोमवार  दि.१०/०६/२०२४ रोजी  सकाळी १०.३० वाजता मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला.

यावेळी अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,पोलीस निरीक्षक रणजीत माने,आगार प्रमुख संजय भोसले,उद्योजक संजय आवताडे हे उपस्थित होते
वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व शालेय मुलांना कळावे यासाठी इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांना वृक्ष भेट देण्यात आले असून तेच झाड पोलीस स्टेशनच्या परिसरात विदयार्थ्यांच्या हस्ते लावण्यात आले आहे
सदर कार्यक्रमास वारी परिवाराचे विशेष सहकार्य लाभले असून सर्व  निसर्गप्रेमी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. तर कार्यक्रमाची सांगता रत्नपारखी ज्वेलर्स चे मालक जयदीप रत्नपारखी यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!