सफलता बुक सेलर्सचा दुसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा
सफलता बुक सेलर्स (वाढेगाव नाका, सांगोला) दुसरा वर्धापन दिन 10 जून 2024 रोजी आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
या बूक सेलर्सने ग्राहकांचा विश्वास जिंकून ग्राहकांच्या मागण्या म्हणजेच, स्पर्धात्मक परीक्षांची विविध प्रकारची पुस्तके तसेच विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी सर्व प्रकारची साहित्य योग्य दरात देऊन आपली वाटचाल करण्यात आपले यश मिळविले. ग्राहकांनीही आमच्यावर विश्वास ठेवुन सफलता बुक सेलर्सला दोन वर्ष पूर्ण करण्यास सहाय्य केले.
विद्यार्थ्यांना पुस्तके शालोपयोगी साहित्यसोबत झेरॉक्स सुद्धा काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वर्धापनदिवस साजरा करताना आसपास परिसरातील लोक व काही ग्राहकही उपस्थित राहिले तसेच त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.