रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने करिअर मार्गदर्शन चार्ट चे उद्घाटन…
रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने दहावी व बारावी नंतर काय ? हा प्रश्न मुलांच्या मनात येतो. त्यासाठी करिअर गायडन्स करणारा हा चार्ट विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी लावण्यात आला. संपूर्ण ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर करिअर बद्दल मार्गदर्शन मिळत नाही म्हणून रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने हा करिअर मार्गदर्शन करणारा चार्ट महात्मा फुले चौक येथे लावण्यात आला.
या संपूर्ण चार्टमुळे विद्यार्थ्यांना फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळाले अशा प्रतिक्रिया पालक वर्गातून व विद्यार्थी वर्गातून मिळाल्या. अशा पद्धतीचे सामाजिक काम रोटरी मार्फत केले जाते त्यासाठी रोटरीचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
हा चार्ट लावण्यासाठी रोटरीन विकास देशपांडे, रोटरीन अशोक गोडसे, रोटरियन दीपक चोथे, रोटरियन हळळीसागर, डोंबे गुरुजी रोटरीन डॉक्टर कांबळे, महाजन भाऊसाहेब इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.
या चार्टचे उद्घाटन अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्यात आले निजामपूर येथील इयत्ता दहावी पास चे विद्यार्थी प्रतीक व वैभव लवटे या दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते या चार्टचे उद्घाटन करण्यात आले. अशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने रोटरी काम करत असते हे सर्वांना दिसून आले. अशा प्रकारच्या समाजसेवेसाठी समाजाच्या सर्व स्तरातून रोटरीचे स्वागत होत आहे.