बुद्धेहाळ तलावाचा टेंभू योजनेत समावेश-आ.शहाजी बापू पाटील; आमदार व खासदार आपल्या दारी नाझरे गाव भेट दौरा संपन्न

नाझरे(वार्ताहर):-बुद्धेहाळ तलावाचा टेंभू योजनेत समावेश केला असून लवकरच तेथे पर्यटन स्थळ करू व श्री दत्त मंदिरास तीन ते चार कोट रुपये देऊन तेथेही पर्यटन स्थळ म्हणून विकसित करू. यासाठी मी स्वतः व खासदार रणजीतसिंह निंबाळकर रात्रंदिवस काम करून निधी कमी पडू देणार नाही कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपला शब्द पडू देत नाहीत. त्यामुळे सांगोला तालुका हिरवा गार करणार असून प्रत्येकाने ध्येय जिद्द बाळगून धाडसाने काम करा असे आवाहन केले. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, सर्वांनी सहकार्य करा विकासासाठी आम्ही दोघे मागे राहणार नाही याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी नाझरे येथे गाव भेट दौर्यात दिली.
सांगोल्यास उजनीचे पाणी देणारे पहिले खा.रणजितसिंह निंबाळकर असून आमदार शहाजीबापू यांनी कोट्यावधीचा निधी आणून विकास केला. मुस्लिम समाज दर्ग्यास मोठा निधी व इदगाह मैदानासाठी ही मोठा निधी देऊन विकास कामात कमी नाही हे दाखवून दिले तसेच नाझरे येथील मान नदीवर मोठा पूल करावा असे मत शिवसेना नेते दादासो वाघमोडे यांनी व्यक्त केले.श्री दत्त मंदिर पर्यटन स्थळ म्हणून निवड करा असे मत भाजपा नाझरे अध्यक्ष नंदकुमार रायचुरे यांनी सांगितले.पाण्यासाठी साठ वर्षे तालुक्यात ससा दाखविला परंतु आता असे होणार नाही असे मत शिवसेना तालुकाध्यक्ष दादासो लवटे यांनी व्यक्त केले तर मतदान बघून विकास नाही मत नाही तरी विकास करणारे खासदार व आमदार आहेत तसेच श्री दत्त मंदिरास पंधरा लाखाची तरतूद केली आहे असे मत भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी व्यक्त केले.
यावेळी अतुल पवार, शिवसेना नेते सागर पाटील, गुंडादादा खटकाळे, सरपंच नवनाथ बनसोडे, उपसरपंच गणी काझी, ग्रामपंचायत सदस्य के.आर.वाघमारे,जीवन कांबळे,हरी पाटील, राजू खरात, मंगेश सचिन वाघमारे, आनंदा बनसोडे, भैय्या वाघमोडे, अमोल विभुते, रशीद काझी, दादासो खरात, अजय सरगर, साहेबराव शिंदे, पांडुरंग मिसाळ, तात्यासो शिंदे, रमेश पाटील, मुकुंद पाटील, अण्णासो पाटील, तानाजी काटे यांच्यासह युवक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.