महाराष्ट्र

मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालयात दिले आदर ,प्रेम ,ज्ञान आणि संस्काराचे धडे

सांगोला: मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालयात गुरु पौर्णिमा सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजरी करण्यात आली विद्येची देवता सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये बाल वर्गातील मुलांनी मनाचे श्लोक सादर केले व सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सर्व शिक्षकांसाठी भेटवस्तू तयार केल्या व गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुबद्दल असणाऱ्या भावना व विद्यार्थी म्हणून त्यांची गुरुबद्दल असणारा अज्ञाधारकपणा व्यक्त केला व विद्यार्थ्यांनी गुरु विषयी भाषणे केली कविता सादर केल्या. गुरु पौर्णिमेचे महत्व व का साजरी केली जाते याची माहिती विद्यालयातील सहशिक्षिका पवार मॅडम यांनी दिली.

साक्षात परमेश्वराला देखील सद्गुरूंची गरज वाटली म्हणून तर प्रभू श्री रामांनी वशिष्ठांचे आणि श्रीकृष्णाने संदिपनींची सेवा केली आणि त्यांना गुरु मानले.गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते. हिंदू कालगणने प्रमाणे आषाढ (जून-जुलै) महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मुलांना गुरु व शिष्य यांच्या कथा सांगितल्या . त्या वेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहशिक्षक रणदिवे सर यांनी केले.

या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापक श्री.खतीब सर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक कानगुडे सर ,विद्यालयाच्या समन्वयीका सौ.आर्शिका खतीब मॅडम, प्राथमिक विभाग प्रमुख सौ शिंदे मॅडम व सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागात हा कार्यक्रम पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button