रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेक, सांगोला येथील दलित चळवळीतील धडाडीचे नेते सुरजदादा देवा बनसोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात सायंकाळी 6 वाजणेच्या सुमारास उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 44 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण, भावजय, चुलते, मेहुणे असा मोठा परिवार आहे.
दलित चळवळीतील अत्यंत धडाडीचा, परखड, स्पष्टवक्ता नेता म्हणून सुरजदादा यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे दलित चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी ८ .30 वाजता सांगोला भिमनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून सांगोला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.