फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी ची विद्यार्थिनी कु. प्रणाली भारत बंडगर हिचे प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये घवघवीत यश

येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात तृतीय वर्ष बी फार्मसी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु. प्रणाली भारत बंडगर हिने सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी, बार्शी या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून (४९/५०) घवघवीत यश प्राप्त केले ही स्पर्धा चौथ्या राष्ट्रीय फार्माकोव्हिलीजन्स २०२४ निमित्ताने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर व परिसर संचालक डॉ संजय अदाटे व फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button