महाराष्ट्र

श्री गुरुकुल विद्यापीठ राजुरीच्या तब्बल 48 विद्यार्थ्यांनी नॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये मिळवले गोल्ड मेडल

श्री गुरुकुल विद्यापीठ, राजुरी या सांगोला तालुक्यामध्ये अल्पावधीत नावारुपास आलेल्या प्रशालेतील 48 विद्यार्थ्यांनी नॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेत गोल्ड मेडल मिळवून स्वतःचे, पालकांचे व प्रशालेचे नाव उज्वल केले. रुतिका काशीद या विद्यार्थीनीस सोलापूर जिल्ह्यातील झोनल ॲवॉर्ड मिळाले.
इंग्रजी विषयात दोन, मॅथ्स विषयात 19 व सायन्स विषयात चार विद्यार्थी द्वितीय स्तरासाठी पात्र ठरले. इयत्ता पहिलीतील आराध्या काळेल , आरव मिसाळ, पियुष शिंदे , शौर्य बाबर , इयत्ता दुसरीतील युवराज मिसाळ , आरुष काळेल , इयत्ता तिसरीतील रुतिका काशीद , आरोही काशीद, स्वप्निल कोळेकर , केतकी साळुंखे , शंभू दबडे , सृष्टी कोडग , इयत्ता चौथी मधील प्रणव बाबर, आराध्या अलिगावे, गौरी पातकळ , श्रेया काशीद, वैष्णव गुरव,इयत्ता सहावी मधून प्रणव मोरे , अविनाश गडदे, सुफिया इनामदार, प्रणाली गडदे, जयदीप गायकवाड, संस्कृती गडदे, सानिका बाबर,इयत्ता सातवी मधून आरती काळे, इयत्ता आठवी मधून ऋतुजा बाबर, इयत्ता नववी मधून पृथ्वीराज आदट, सुजल भंडारे, अविनाश भुसनर, सुजल खांडेकर, दिग्विराज काशिद, प्रथमेश गडदे, सानिका दबडे, वैभव दबडे.
गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष मा.महादेव (बापू) बाड, संस्था सचिवा सौ.शिरमा (काकी) बाड, प्राचार्य श्री.बी.एस.गायकवाड, अनिवासी प्रशालेच्या व्यवस्थापन प्रमुख सौ.मुलाणी मॅडम यांनी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन अभिनंदन केले व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव केला.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button