शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नी जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने निवेदन देऊन चर्चा

मंगळवेढा ( दि. ३० ) जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या  सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने  शिक्षणाधिकारी संजय जावीर  यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा करण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी यांनी दिली .
 शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मरवडे येथे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची भेट घेऊन समाजशास्त्र विषय शिक्षकांचे समायोजन करताना समानीकरणाच्या जागा खुल्या कराव्यात , भाषा विषय शिक्षकांचे विहीत नमुन्यातील ऐच्छिक नकार मंजूर करावेत ,
मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती त्वरीत करण्यात यावी , शि.वि.अ. पदोन्नतीचे आदेश त्वरीत देण्यात यावेत , प्रभारी
मुख्याध्यापक चार्ज बाबतीत संभ्रम दूर करण्यासाठी स्वयंस्पष्ट निर्देश देणारे पत्र काढण्यात यावे ,
अनु.जमातीचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे / अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर  वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा विषयक निवृत्ती लाभ मंजूर करणेबाबत पत्र निर्गमित करावे,  मासिक वेतन विलंब दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात  इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
   या सर्व  बाबींवर यावेळी  चर्चा करण्यात आली. विशेषतः समानीकरण जागा खुल्या  करणेबाबत आग्रही मागणी करण्यात आली. यामध्ये १९ कन्नड भाषिक विषय शिक्षकांचे नकार मंजूर करण्यात आले आहेत मात्र उपशिक्षकांची पदे त्या प्रमाणात जागा रिक्त नसल्याची बाब संघटनेच्या वतीने  निदर्शनास आणून देण्यात आली. शिवाय माढा , करमाळा , माळशिरस , द. सोलापूर या विविध तालुक्यातील समानीकरणाच्या जागा खुल्या करण्याची अनिवार्यता याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती अतिरिक्त विषय शिक्षक  समायोजन प्रक्रियेत शिक्षक बांधवांची सोय आणि शैक्षणिक गरज या दोन्ही बाबींचा ताळमेळ घालून समानीकरण खुले करण्याबाबत प्रशासन अनुकूल असल्याचा निर्वाळा जावीर यांनी दिला.याशिवाय विज्ञान विषय शिक्षकांना शैक्षणिक अर्हता धारण करण्यासाठी वाढीव कालावधी मिळावा यादृष्टीने सोलापूर जिल्हा परिषदेकडून आवश्यक तो पाठपुरावा करावा असे स्वतंत्र निवेदन देण्यात आले.
       यावेळी मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे , शि.वि.अ. डाॕ. बिभिषण रणदिवे , राष्ट्रवादीचे नेते लतिफभाई तांबोळी , शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार , मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष विठ्ठलराव ताटे , तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन रावसाहेब सुर्यवंशी ,आप्पाराया न्यामगोंडे , नानासाहेब जाधव , हिरालाल कोंडूभैरी , विठ्ठल खांडेकर  यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button